Scroll untuk baca artikel
Example 325x300
Example floating
Example floating
Example 728x250
करियर

Ethical Hacking Full Guide 2025 | एथिकल हॅकिंग म्हणजे काय? संपूर्ण मार्गदर्शक

197
×

Ethical Hacking Full Guide 2025 | एथिकल हॅकिंग म्हणजे काय? संपूर्ण मार्गदर्शक

Share this article
Example 468x60

Introduction | प्रस्तावना 

                            डिजिटल युगात आपण सर्वजण इंटरनेटवर आणि  सोशल मीडियावर अवलंबून आहोत. ऑनलाइन बँकिंग, क्लाउड स्टोअरेज,यूपीआई,सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि ईमेल यांसारख्या सुविधांनी आपले जीवन सुलभ केले आहे. पण या सोयींसोबतच सायबर गुन्ह्यांचा धोका देखील वाढला आहे. हॅकर्स आपली माहिती चोरतात, खाती हॅक करतात आणि आर्थिक नुकसान करतात. अशा वेळी “एथिकल हॅकिंग” (नैतिक हॅकिंग) ही संकल्पना आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरते. पण एथिकल हॅकिंग म्हणजे नेमके काय? हे कसे काम करते? आणि त्याचे फायदे काय आहेत? या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

Example 300x600

एथिकल हॅकिंग म्हणजे काय?

एथिकल हॅकिंग म्हणजे संगणक प्रणाली(ऑपरेटिंग सिस्टीम) व नेटवर्क किंवा वेबसाइटमधील असुरक्षा थोडक्यात Bugs (व्हल्नरेबिलिटीज) शोधण्यासाठी हॅकिंग तंत्रांचा वापर करतात, परंतु हा वापर कायदेशीर आणि चांगल्या उद्देशासाठी याचा वापर केला जातो. एथिकल हॅकर्स हे तंत्रज्ञानात तज्ज्ञ असतात जे मालकाच्या परवानगीने प्रणालीतील कमकुवत जागा शोधतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी मदत करतात. थोडक्यात, हे “चांगले हॅकर्स” आहेत जे सायबरसुरक्षेला प्राधान्य देतात.

उदाहरण द्यायचे झाले तर, समजा एखादी बँक आपली वेबसाइट सुरक्षित आहे की नाही हे तपासू इच्छिते. ती एथिकल हॅकर्सना बोलावते आणि सांगते, “आमच्या सिस्टममध्ये किंवा साईटमध्ये त्रुटी शोधा आणि ते फिक्स करा काय असेल तर त्याची फीस सांगा.” एथिकल हॅकर्स त्या वेबसाइटवर नियंत्रित हल्ला करतात त्याला आपण Pentesting म्हणतात, कमजोरी शोधतात आणि नंतर त्या दुरुस्त करण्याचा सल्ला देतात. हे सर्व कायदेशीर परवानगीने आणि नैतिक मर्यादेत होत असते.

एथिकल हॅकिंग आणि बेकायदेशीर हॅकिंगमधील फरक

हॅकिंग हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यात नकारात्मक गोष्टी येतात आणि- एखादी व्यक्ती संगणकासमोर बसून दुसऱ्याचे खाते हॅक करतात किंवा पैसे चोरतात . हे सर्व कामे ही बेकायदेशीर हॅकिंग म्हणून मानले जातात, ज्याला “ब्लॅक हॅट हॅकिंग” म्हणतात. याउलट, एथिकल हॅकिंगला “व्हाइट हॅट हॅकिंग” असे बोलले जाते. यात हॅकर्स आपल्या चांगल्या हेतूने आणि परवानगीने काम करतात.ब्लॅक हॅट हॅकर्स: बेकायदेशीरपणे हॅकिंग करतात, सोबतच कार्डिंग, फेक माहिती गोळा करून नुकसान करतात आणि कायद्याचे उल्लंघन करतात.व्हाइट हॅट हॅकर्स: कायदेशीरपणे प्रणाली & सिस्टीम सुरक्षित करण्यासाठी हॅकिंग करतात.ग्रे हॅट हॅकर्स: हे मध्यम मार्गाचे असतात म्हणजे दोन्ही काम करतात ; कधी कधी प्रसंगात , परवानगीशिवाय हॅकिंग करतात, पण नुकसान करत नाहीत.

एथिकल हॅकिंगचे महत्त्व (Importance of Ethical Hacking)

एथिकल हॅकिंग म्हणजे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रणालीतील (System) असुरक्षितता शोधणे आणि त्याचे निवारण करणे. यामुळे हॅकर्सकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून संरक्षण मिळते.आज सायबर हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. फिशिंग, मालवेअर, रॅन्समवेअर आणि डेटा चोरी यांसारख्या घटना रोज घडतात. अशा एकंदरीत परिस्थितीत एथिकल हॅकिंग का महत्त्वाची आहे हे आपण या मुद्यात लक्षात घेऊ सोबतच उदाहरणात सहित घेऊ,

1. सायबर गुन्हे रोखण्यासाठी

सायबर गुन्हेगार प्रणालीतील सुरक्षा दोष शोधून डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. एथिकल हॅकर्स हे दोष आधीच शोधून त्यावर उपाययोजना करतात.

उदाहरण: जर बँकेच्या वेबसाइटमध्ये सुरक्षा त्रुटी आढळली, तर एथिकल हॅकर ती दुरुस्त करून बँकेचा डेटा सुरक्षित ठेवतो.

2. संस्थांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी

मोठ्या कंपन्या आणि सरकारी संस्थांमध्ये संवेदनशील माहिती असते. एथिकल हॅकिंगद्वारे डेटा लीक होण्यापासून संरक्षण होते.जसे Database सर्वर सुरक्षा देतात

उदाहरण: Aadhaar डेटाबेस सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा तज्ञ सतत चाचण्या घेतात.

3. नेटवर्क आणि सिस्टम सुरक्षित करण्यासाठी

नेटवर्कवर होणारे DDoS, MITM, आणि फिशिंग सारखे हल्ले रोखण्यासाठी एथिकल हॅकर्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

उदाहरण: जर कोणीतरी Wi-Fi हॅक करून माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असेल, तर एथिकल हॅकर नेटवर्क मजबूत करून तो धोका टाळतो.तसेच फायरवॉलचा वापर करतात त्यात आपण नियम टाकू शकतो.

4. वेबसाइट आणि मोबाइल अॅप्लिकेशन सुरक्षित करण्यासाठी

अनेक अॅप्समध्ये सुरक्षा त्रुटी असतात ज्या ग्राहकांची माहिती धोक्यात आणू शकतात. एथिकल हॅकर्स अशा अडचणी शोधून त्या दुरुस्त करतात.

उदाहरण: जर UPI पेमेंट अॅपमध्ये बग आढळला, तर एथिकल हॅकर तो बग शोधून कंपनीला कळवतो आणि तो फिक्स केला जातो. त्यासाठी हॅकरला सन्मान म्हणून rewards मिळतात.

5. संवेदनशील उद्योगांमध्ये (Sensitive Industries)

संरक्षण, आरोग्य, बँकिंग आणि पासपोर्ट या सारख्या सरकारी संस्थांमध्ये एथिकल हॅकिंग अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा वापर करून  नकली कागद वापर करून याचा गैर फायदा घेतात

    उदाहरण: संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईट्सवर होणारे हल्ले ओळखून सुरक्षा अधिक मजबूत केली जाते.

एथिकल हॅकिंगचे प्रकार (Types of Ethical Hacking)

एथिकल हॅकिंगमध्ये विविध प्रकारच्या प्रणाली आणि नेटवर्क्सची सुरक्षा तपासली जाते. याचा उपयोग सायबर हल्ले टाळण्यासाठी आणि सुरक्षा बळकट करण्यासाठी केला जातो. खाली एथिकल हॅकिंगचे प्रमुख प्रकार दिले आहेत:

१. वेब अॅप्लिकेशन हॅकिंग (Web Application Hacking)

✅ उद्देश: वेबसाइट्स आणि वेब अॅप्समधील सुरक्षा दोष (Bugs & Vulnerability) शोधणे आणि दुरुस्त करणे.
✅ उदाहरण: SQL Injection, Cross-Site Scripting (XSS), CSRF आदी हल्ले शोधणे आणि प्रतिबंध करणे.

२. नेटवर्क हॅकिंग (Network Hacking)

✅ उद्देश: नेटवर्कमधील सुरक्षात्मक त्रुटी शोधणे आणि त्याचे संरक्षण करणे आणि सुरक्षित नेटवर्क प्रदान करणे.
✅ उदाहरण: Wi-Fi हॅकिंग, MITM (Man-in-the-Middle) हल्ले, DDoS अटॅक प्रतिबंध करणे.

३. सिस्टम हॅकिंग (System Hacking)

✅ उद्देश: संगणक आणि सर्व्हरमधील कमकुवत लिंक शोधणे आणि त्यांना सुरक्षित करणे. OS सिक्युरिटी हे महत्वाचा आहे , त्यातील Bugs शोधणे याचा काम असते.
✅ उदाहरण: पासवर्ड क्रॅकिंग, मालवेअर शोधणे, अनधिकृत प्रवेश टाळणे.

४. मोबाइल हॅकिंग (Mobile Hacking)

✅ उद्देश: अँड्रॉइड व iOS अॅप्स आणि डिव्हाइस सुरक्षित करणे. जे मोड ॲप्स त्यांना सुरक्षित करणे त्यात बदल करणे,
✅ उदाहरण: APK Reverse Engineering, बॅकडोअर तपासणी, SMS आणि कॉल इंटरसेप्शन.

५. ई-मेल हॅकिंग (Email Hacking)

✅ उद्देश: ई-मेल सुरक्षा वाढवणे आणि फिशिंग हल्ले प्रतिबंध करणे.
✅ उदाहरण: Spoofing, Phishing, Business Email Compromise (BEC) हल्ले शोधणे.

६. सोशल इंजिनिअरिंग हॅकिंग (Social Engineering Hacking)

✅ उद्देश: लोकांची माहिती फसवणुकीने मिळवून सुरक्षा जोखमी ओळखणे. ओखळ पटवून त्यांना बाटलीत उतरून माहिती काढणे
✅ उदाहरण: फिशिंग (Phishing), व्हॉट्सअॅप OTP फसवणूक, कॉल द्वारे माहिती मिळवणे.

७. क्लाउड हॅकिंग (Cloud Hacking)

✅ उद्देश: AWS, Azure, Google Cloud यांसारख्या क्लाउड प्लॅटफॉर्म्सची सुरक्षा तपासणे. S3 बकेट ची सुरक्षा पाहणे.
✅ उदाहरण: डेटा लीक, अयोग्य साठवणूक परवानग्या, क्लाउड मॅलवेअर हल्ले शोधणे.

८. वायरलेस नेटवर्क हॅकिंग (Wireless Hacking)

✅ उद्देश: Wi-Fi आणि ब्लूटूथ नेटवर्क्समधील सुरक्षा बळकट करणे. ब्लूटूथ यांना सारखा रिक्वेस्ट पाठवून तुम्ही device डाउन करू शकतात
✅ उदाहरण: WPA/WPA2 हॅकिंग, Rogue Access Point, Packet Sniffing.

९. IoT हॅकिंग (Internet of Things Hacking)

✅ उद्देश: स्मार्ट डिव्हाइसेस (CCTV, Smart Home Devices) सुरक्षित करणे.
✅ उदाहरण: हॅकर्सकडून कॅमेरे, स्मार्ट डिव्हाइस आणि ऑटोमेशन सिस्टम सुरक्षित करणे.

१०. क्रिप्टोग्राफी हॅकिंग (Cryptography Hacking)

✅ उद्देश: डेटा एनक्रिप्शन आणि सिक्युरिटी अल्गोरिदम तपासणे.
✅ उदाहरण: Hash Cracking, SSL/TLS Weakness Analysis, Blockchain Security Testing.

एथिकल हॅकर्स कसे काम करतात?

एथिकल हॅकर्स हे अधिकृतरित्या (Authorized) प्रणाली आणि नेटवर्कमधील सुरक्षा त्रुटी शोधून त्यांचे निवारण करतात. ते सायबर हल्ले टाळण्यासाठी आणि संस्थांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी विविध हॅकिंग टेक्निक्स वापरतात.

१. एथिकल हॅकिंगची कार्यपद्धती (Work Process of Ethical Hackers)

१. माहिती संकलन (Information Gathering – Reconnaissance)

✅ हॅकर्स लक्ष्यित प्रणाली, टेक्निक्स computer नेटवर्क किंवा वेब अॅपबद्दल माहिती गोळा करतात. त्याला फूटप्रिंटिंग म्हणतात, मोबाईल नंबर ची डिटेल्स गोळा करणे यालाच OSINT पण म्हणतात.
✅ साधने: Nmap, Shodan, Recon-ng, Maltego, OSINT Framework या सारख्या हॅकिंग टूल वापरून माहिती गोळा करायचे असते.
✅ उदाहरण: एखाद्या वेबसाइटची IP, DNS, किंवा सबडोमेन माहिती मिळवणे. Subdomain Finder चे वापर करून सब डोमेन गोळा करणे.

२. स्कॅनिंग (Scanning)

✅ टार्गेट सिस्टममध्ये असलेल्या असुरक्षित गोष्टी शोधल्या जातात. कोणते ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात, काय बग्स आहेत ते पाहतात.
✅ साधने: Nessus, Nikto, OpenVAS, Acunetix
✅ उदाहरण: सर्व्हरवर चालणाऱ्या सेवा आणि त्यातील सुरक्षा दोष ओळखणे. जसे SSL certificate मध्ये expire झाले आहे. PHP Version जुने झाले आहे त्या रिपोर्ट मध्ये दाखवत आहे

३. सिस्टममध्ये घुसखोरी (Gaining Access – Exploitation)

✅ शोधलेल्या सुरक्षा त्रुटींचा वापर करून टार्गेट सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. जे बग्स पाहून त्याचा फायदा घेऊन आपण सिस्टीम ऍक्सेस करू शकतो.
✅ साधने: Metasploit, Burp Suite, SQLmap, Hydra
✅ उदाहरण: कमजोर पासवर्ड ब्रूटफोर्स करून किंवा SQL Injection करून अनधिकृत प्रवेश मिळवणे.

४. प्रवेश टिकवून ठेवणे (Maintaining Access)

✅ एकदा प्रवेश मिळाल्यानंतर, तो दीर्घकाळ टिकवता येईल का ते तपासले जाते. जसे आपला पासवर्ड चेंज करणे, विविध मार्ग शोधून प्रवेश मिळते
✅ साधने: Netcat, Empire, Cobalt Strike
✅ उदाहरण: रिमोट अॅक्सेस टूल्स वापरून सतत प्रवेश ठेवणे.

५. पुरावे नष्ट करणे (Clearing Tracks – Optional in Ethical Hacking)

✅ हॅकर्स त्यांच्या हालचालींचे पुरावे हटवतात जेणेकरून हल्ल्याचा माग काढता येऊ नये. जे काही आपण सर्च करतो जशी वापर इतिहास क्लीन करणे.
✅ साधने: CCleaner, Secure Delete, Log Tampering Tools
✅ उदाहरण: लॉग फायली डिलीट करणे किंवा एडिट करणे.

६. रिपोर्ट तयार करणे (Reporting & Fixing Vulnerabilities)

✅ संस्थेला सर्व सुरक्षा त्रुटी आणि त्यावर उपाययोजना दिल्या जातात.
✅ यात CVSS स्कोअरिंग आणि रेमिडिएशन प्लॅन समाविष्ट करवा लागतं.
✅ उदाहरण: SQL Injection साठी सुरक्षित कोडिंग मार्गदर्शक तत्त्वे देणे.

२. एथिकल हॅकिंगमध्ये वापरली जाणारी प्रमुख साधने (Top Tools Used by Ethical Hackers)

✅ Reconnaissance (माहिती संकलनासाठी) – Nmap, Shodan, Maltego
✅ Scanning (स्कॅनिंगसाठी) – Nessus, OpenVAS, Nikto
✅ Exploitation (हल्ला करण्यासाठी) – Metasploit, SQLmap, Burp Suite
✅ Password Cracking (पासवर्ड क्रॅकिंगसाठी) – Hydra, John the Ripper
✅ Wireless Hacking (वायरलेस नेटवर्कसाठी) – Aircrack-ng, Wireshark

३.नैतिक हॅकिंगसाठी आवश्यक कौशल्ये

एथिकल हॅकर बनण्यासाठी काही तांत्रिक आणि एथिकल कौशल्ये आवश्यक असते:

  • प्रोग्रामिंग ज्ञान (Programming Knowledge) : पायथन, जावा, C++ सारख्या भाषांचे ज्ञान.
  • नेटवर्किंग(Networking): नेटवर्क प्रोटोकॉल आणि सिस्टम समजणे.
  • हॅकिंग टूल्स(Hacking tools): Kali Linux, Metasploit, Wireshark यांसारख्या साधनांचा वापर.
  • Legal Boundry : कायदेशीर मर्यादेत राहून काम करण्याची वृत्ती.
  • समस्या सोडवण्याची क्षमता(Problem Solving Skill): जटिल त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याचे कौशल्य.

Disclaimer (अस्वीकृती)

  • एथिकल हॅकिंग हा कायदेशीर आणि नैतिक मर्यादेत राहून केला जाणारा अभ्यास आहे. केवळ अधिकृत परवानगी असलेल्या नेटवर्क, सिस्टम किंवा वेब अॅप्लिकेशनवरच सुरक्षा चाचणी केली पाहिजे.
  • सायबर गुन्हेगारी कायद्यांचे उल्लंघन करणे बेकायदेशीर आहे. कोणत्याही अनधिकृत हॅकिंगमुळे IT Act 2000 (India), GDPR (Europe), CFAA (USA) सारख्या सायबर कायद्यांखाली कारवाई होऊ शकते.
  • हा मार्गदर्शक फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने आहे. गैरवापर करण्याची कोणतीही जबाबदारी आमच्यावर राहणार नाही.

निष्कर्ष (Conclusion)

  • एथिकल हॅकिंग हे सायबर सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वाचे कौशल्य आहे. कंपन्या आणि संस्था सुरक्षित राहण्यासाठी एथिकल हॅकर्सवर अवलंबून असतात.
  • एक कुशल एथिकल हॅकर होण्यासाठी नेटवर्किंग, प्रोग्रामिंग, पेन-टेस्टिंग आणि सोशल इंजिनिअरिंग यासारखी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.
  • नियमितपणे नवीन हॅकिंग तंत्र, सुरक्षा उपाय आणि सायबर धोके समजून घेणे गरजेचे आहे.
  • CEH, OSCP, CISSP सारखी प्रमाणपत्रे घेतल्यास करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.
Example 300250
Example 120x600

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *